गावाची ग्रामपंचायत

आंदुर्ले हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. आंदुर्ले हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे 20 किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे 35 किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये 12 वाड्या आहेत. गावची लोकसंख्या 2780 इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये 3 प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये 10 कार्यकारिणी सदस्य, ग्रामसेवक व 5 कर्मचारी आहेत.
आंदुर्ले ग्रामपंचायतने राबविला 'जन्म लेकीचा.. समृद्ध गावाचा' हा नाविन्यपूर्ण उपक्रम..
सरपंच, उपसरपंच एका महीन्याच्या मानधनासोबत ग्रामपंचायत सदस्य यांचा एका महिन्याचा मासिक सभा बैठक भत्ता देवून गावातील मूलीच्या जन्माचे स्वागत करणारी जिल्ह्यातील पहीली ग्रामपंचायत

नाविन्यपूर्ण उपक्रम

भव्य स्वच्छता अभियान
आंदुर्ले ग्रामपंचायत, ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे भव्य स्वच्छता अभियान यशस्वी!
सर्व महीला ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून गाव स्वच्छ, निरोगी आणि सुंदर बनवण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरला.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आंदुर्ले सरपंच यांच्या संकल्पनेतून आंदुर्ले ग्रामपंचायतच्या वतीने 'प्रत्येक रविवार' गावासाठी या मोहिमे अंतर्गत प्रत्येक रविवार ग्रामस्थांच्या वतीने श्रमदान केले जाते.
जन्म लेकीचा.. समृद्ध गावाचा
पेशंट बॅंक
आंदुर्ले ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आंदुर्ले गावातील पेशंटांना तसेच जेष्ठ नागरिक आजारी असल्यावर त्यांना आवश्यक असणारे साहीत्य हे त्यांना पेशंट बॅंकच्या माध्यमातून मागणीनुसार उपलब्ध करुन दिले जाणार आहे.व त्यांची होणारी गैरसोय दुर करण्यात आली आहे.ग्रामपंचायतच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे
श्रमदानातून वनराई बंधारा

मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत आंदुर्ले येथील सरपंच श्री.अक्षय तेंडोलकर, उपसरपंच श्री.चंद्रकीसन मोर्ये, ग्रामपंचायत सदस्य सौ.सुप्रिया येरम, यांच्या पुढाकाराने गुरुकृपा महिला स्वयं सहायता समूह, श्री देव ब्राह्मण महिला स्वयं सहायता समूह,श्री समर्थ कृपा महिला स्वयं सहायता समूहा मधील महीला व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून वनराई बंधारा घालण्यात आला.यासाठी २० महीलांनी श्रमदान केले.प्रतिवर्षी आंदुर्ले ग्रामपंचायतच्या वतीने 'पाणी अडवा पाणी जिरवा' वनराई बंधारे मोहीम श्रमदानातून राबविण्यात येते.