रमाई आवास योजना
थोडक्यात माहिती : रमाई आवास योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे, जी राज्यातील अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध घटकांतील व्यक्ती/कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी राबविली जाते.
लाभार्थी पात्रता : 1) लाभार्थी अनुसूचित जाती (SC) किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
2) वार्षिक उत्पन्न ₹1,20,000 /- पर्यंत
3) लाभार्थी बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
4) यापूर्वी शासनाच्या कोणत्याही घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
कागदपत्रे:
सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र
जातीचा दाखला
उत्पन्नाचा दाखला
बँक पासबुक झेरॉक्स
जॉबकार्ड
जागेची कागदपत्रे
लाभाचे स्वरुप:
1,20,000 + मनरेगा मजूरी + शौचालय अनुदान
निवड प्रक्रिया : प्राप्त उद्दिष्ठानुसार लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेत केली जाते. अंतिम निवड मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून केली जाते.
